कवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्ताने कोळी समाज बांधवांंच्या बैठकीचे आयोजन

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  आद्य कवी महर्षि वाल्मीक यांची जंयती साजरी करण्यासाठी आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवांची मंगळवार  दि. ४ ऑक्टोबर रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

रविवार  दि. ९ ऑक्टोंबर रोजी आद्य कवी महर्षि वाल्मीक जंयती साजरी  करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर यावल तालुक्यातील आदिवासी टोकरे कोळी समाज बांधवाची महत्त्वाची बैठक मंगळवार दि.४ ऑक्टोबर  रोजी ११ वाजता यावलच्या जिंनिग प्रेस सोसायटी सभागृहात वढोदा प्र सरपंच संदिप सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस यावल तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,यावल एस.टी.आगारातील कर्मचारी बांधव, विविध संस्थाचे पदाधिकारी सह समाज बांधवानी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. हे आवाहन नंदु सोनवणे (रीधुरी ) , विकास सोळके (कोळन्हावी ) , खेमचंद कोळी (पाडळसा ), राहुल तायडे (बामणोद ), गजानन कोळी पीप्री,  प्रदिप कोळी ( भालोद ), समाधान सोनवणे (थोरगव्हाण ), प्रमोद कोळी (शिरसाड ‘, गोटु सोनवणे (शिरसाड ), प्रतापदादा सोनवणे (पथराडे ), बबलु कोळी ( किनगाव ) ,कीरण कोळी ( दहिगाव ) ‘,गोकुळ कोळी (मनवेल ) , संदिप कोळी ( बोरावल ), मोहनभाऊ सपकाळे (पिंप्री ), रतनभाऊ कोळी (भालशिव ) , चिंधू तावडे, मुकुंदा कोळी, नामदेव कोळी,वासुदेव कोळी,बापु तायडे पाडळसे,जितेंद्र कोळी भालोद, शरद कोळी अमर कोळी जालंधर कोळी भरत कोळी सुनिल नन्नवरे यावल , योगेश कोळी अट्रावल ,भगवान कोळी विरोदा यांच्यासह समाज बांधवानी मोठया संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Protected Content