जळगावात ‘खान्देश गॉट टैलेंट २०२५’चे आयोजन

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुळजी जेठा महाविद्यालयातील इव्हेंट मॅनेजमेंट विभागाच्या वतीने ५ जानेवारी रोजी खान्देश गॉट टैलेंट २०२५ सिझन-७” या कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मराठी सिने अभिनेत्री अनिता दाते (झी मराठी वरील सुप्रसिद्ध मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ व ‘नवा गडी नवा राज्य’ फेम) यांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमात आपल्या जळगाव जिल्ह्यातील कलावंताना एक भव्य आणि आश्वासक रंगमंच आम्ही उपलब्ध करून दिले असून यात नृत्य, नाट्य व संगीत या कलांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यकमासाठी आ.राजूमामा भोळे, रामलाल चौबे मेमोरियल ट्रस्ट चे अध्यक्ष प्रकाशजी चौबे, अॅड, नारायण लाठी, डॉ. निलेश चांडक, अॅड, संजयजी राणे, उद्योजक प्रमोद संचेती, उद्योजक तेजांस कडू, अॅड. राजेश झाल्टे, समाजसेविका आशा अंभोरे, प्रवीण कुंजिवाल, नोबेल स्कूलच्या चेअरमन अर्चना सूर्यवंशी, के. सी. ई. सोसायटीचे सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडोदकर, महाविद्यालयाचे प्राचार्य सं. ना. भारंबे, आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

Protected Content