जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बळीराम पेठ येथील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात जळगाव जिल्हा व महानगर कामगार मोर्चाची संघटनात्मक आढावा बैठक सोमवारी २१ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता कामागार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे हे सोमवारी २१ ऑगस्ट रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. शहरातील बळीरामपेठ येथील पक्ष कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे यांनी कामगार मोर्चाची आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक जळगाव जिल्हा महानगरच्या जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली
याप्रसंगी भाजपाचे माजी महानगर प्रमुख दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, उदयजी भालेराव, कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विजय मोरे, महानगर जिल्हाध्यक्ष कुमार सिरामे, विजय बाविस्कर, मिलीद वाणी, गोविद सैदाणे, अनिल बोरसे, विलास लोहार, राकेश वाघ, किसन मराठे, सुदर्शन पाटील, गणेश माळी, प्रकाश पंडीत, नथूलाल चव्हाण, अरूण धनगर,सुरेश सोनार, सगिता पाटील, नंदीनी दर्जी, चित्रा मालपाणी,जगदीश जोशी यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश सोनार यांनी केले तर आभार गोविद सैदाणे यानी केले.