Home Cities जळगाव मतदान जनजागृती निमित्त पथनाट्य आणि रॅलीचे आयोजन

मतदान जनजागृती निमित्त पथनाट्य आणि रॅलीचे आयोजन


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आनंदीबाई वामनराव कोल्हे मुलींचे विद्यालय व जुनिअर कॉलेजतर्फे मतदार जनजागृती पंधरवाडा अंतर्गत आज मतदान जनजागृती रॅली आणि पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मतदान जनजागृती रॅली आणि चौकाचौकांमध्ये विद्यार्थिनींनी पथनाट्यांचे उत्कृष्टपणे सादरीकरण केले. मतदान जनजागृती विषयक विविध घोषणा देत विद्यार्थिनींनी मतदान करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. रॅलीमध्ये प्राचार्य सी.एस.पाटील ,प्रा. डॉ. डी. यू. राठोड, प्राध्यापक आर.डी. वराडे, प्राध्यापक जोगी प्राध्यापिका जे.आर. नेमाडे, कृष्णा जंगले आदी शिक्षकवृंद रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅली आणि पथनाट्यामध्ये जूनियर कॉलेज विभागातील विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound