अमळनेरात शिक्षकांना देण्यात आले विज्ञान विषयाचे प्रशिक्षण

अमळनेर ( प्रतिनिधी ) “अध्ययन निष्पत्ति नुसार अध्ययन अध्यापन प्रक्रिया असावी. शालेय स्तरावर अध्ययन अध्यापन प्रक्रियेची संकल्पना ही शालेय परिसर व परिस्थिती यावर अवलंबून असते. तसेच विविध विषयांमध्ये समवाय साधतांना सैद्धांतिक विचार करणे गरजेचे आहे. विविध विषयातील भिंती लवचिक झाल्या पाहिजे, यासाठी शिक्षकांनी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. विद्यार्थांनी प्रयोगशाळेत जाणे गरजेचे जरी असले तरी प्रयोगशाळाही विद्यार्थ्यांजवळ आली पाहिजे, असे अध्ययन अध्यापन असावे” असे प्रतिपादन डॉ नरेंद्र महाले यांनी केले.

गुरुवारी (७ फेब्रूवारी) अमळनेर व पारोळा तालुका माध्यमिक शिक्षक विषय विज्ञानाचे प्रशिक्षण येथील जी.एस.हायस्कूलमध्ये सम्पन्न झाले. प्रशिक्षणाला तज्ञ मार्गदर्शक म्हणून एस एस अहिरे, नेहरू विद्यालय, तळवेल, डॉ नरेंद्र महाले, सरस्वती विद्यामंदिर, यावल. रोशन आहेर, न्यू इंग्लिश स्कुल, जामनेर हे उपस्थित होते. अध्ययन अध्यापनात मूल्यमापनासंदर्भात एस. एस. अहिरे सर यांनी मार्गदर्शन केले. रोशन आहेर यांनी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभाग नोंदवला जावा यावर चर्चा केली. डी आय ई सी पी डी चे अधिव्याख्याता शैलेश पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती. अमळनेर व पारोळा तालुक्यातील विज्ञान विषय शिकविणारे सुमारे 200 शिक्षक प्रशिक्षणाला उपस्थित होते.

Add Comment

Protected Content