यावल येथे रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळाच्या वतीने परंपरागत साजरे करण्यात येणारे रावण दहन कार्यक्रमाचे विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवारी २४ ऑक्टोबर मंगळवार रोजी सायंकाळी होणाऱ्या रावण दहन कार्यक्रमासाठी आ. शिरीष चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास  आ.एकनाथराव खडसे, यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, उद्योजक श्रीराम पाटील, प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, माजी नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन फेगडे, काँग्रेस अध्यक्ष प्रभाकर सोनवणे, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, दीपक बेहडे, हाजी मुस्तफा खा सुब्हान खा,  शिवसेना (उबाठाचे) तालुका उपाध्यक्ष शरद कोळी, तुषार उर्फ मुन्ना पाटील, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, कृउबा सभापती हर्षल पाटील, या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न होणार आहे.

गेल्या २५ वर्षापासून संपन्न होत असलेल्या या रावण दहनाच्या कार्यक्रमास संपूर्ण तालुक्यातील नागरिक आतिषबाजी पाहण्यासाठी येत असतात. यावल येथील महर्षी व्यास मंदिराच्या पटांगणामध्ये हा कार्यक्रम आनंदात व उत्साहात संपन्न होतो.  या कार्यक्रमाची आयोजक समिती अध्यक्ष प्रा.मुकेश येवले, अमोल दुसाने, अमोल भिरूड, उमेश फेगडे, डॉ.हेमंत येवले, विवेक देवरे, अरुण लोखंडे, संतोष कवडीवाले, योगेश लावणे, कामराज घारू, चेतन आढळकर, अभिमन्यू चौधरी, शरद कोळी

समिती सदस्यांनी या कार्यक्रमास नागरीकांनी उपस्थित राहावे असे केले आहे.

Protected Content