धनाजी महाविद्यालयात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

फैजपूर -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘राष्ट्रीय क्रीडा दिना’निमित्त धनाजी नाना कॉलेज फैजपूर येथे स्वातंत्र्य उपक्रमाच्या अमृत महोत्सवांतर्गत भव्य ‘मॅरेथॉन स्पर्धे’चे 29 ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत चे अंतर पुरूषांसाठी 5 किमी. व महिलांसाठी 3 किमी. राहील. सदर स्पर्धा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगाव, तापी परिसर विद्यामंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर विद्यार्थी विकास विभाग व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी सोबत दिलेल्या लिंकवर वर क्लिक करून आपले नाव नोंदणी करावे, स्पर्धेत विद्यार्थी व इतर सर्व नागरिक नाव नोंदवून भाग घेऊ शकतात, https://forms.gle/WGnFgD5vFRCdDjtcA सदर लिंकवर नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 27 ऑगस्ट 2022 सायंकाळी 5:00 पर्यंत आहे तरी इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर. चौधरी यांनी केले आहे.

स्पर्धेत नाव नोंदणी करण्यास कोणतेच नोंदणी शुल्क आकारण्यात येणार नाही. विषेश बाब म्हणजे स्पर्धेत सर्वात प्रथम नोंदणी करणाऱ्या 200 स्पर्धकांना मोफत टि-शर्ट मा. लोकसेवक मधुकरराव चौधरी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, फैजपूर, इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मसी काॅलेज, फैजपूर आणि आय. जी. एम. काॅम्प्यूटर्स/ गारमेंट फैजपूर यांच्या मार्फत टि-शर्ट देण्यात येणार आहेत. त्यासोबत स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धा ‘राष्ट्रीय ‘क्रीडा दीन’ निमित्त 29 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7:30 वाजता सुरू होईल, स्पर्धेचा मार्ग क्रम धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथील प्रेरणा स्तंभ ते सुभाष चौक, खुशाल भाऊ रोड, महाजन मेडिकल काॅर्नर, राम मंदिर, तुप गल्ली, लकडपेठ, कालिका माता मंदिर, कुरेशी मोहल्ला, सुभाष चौक आणि शेवट महाविद्यालयाचे प्रेरणास्तंभ असा राहील.

स्पर्धेच्या अधिक माहितीबद्दल महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ.गोविंद मारतळे- 9637105757 व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डाॅ.जी.जी. कोल्हे 8329954898 यांच्याशी संपर्क साधावा.

 

Protected Content