चोपडा, प्रतिनिधी | येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज तिसऱ्या वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी चोपडा नगरपालिकेच्या शोभा देशमुख , कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय क्रीडा संचालिका प्रा. क्रांती क्षीरसागर ,चोपडा, नगरसेविका सरला शिरसाठ, क्रीड़ा शिक्षक सुधाकर बाविस्कर, संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी मॅडम आदि उपस्थित होते.
डॉ. राहुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या बालपणीच्या गोष्टी विद्यार्थ्यांसोबत शेअर केल्या. यावेळी मान्यवरांच्या हातून खेळांना हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात फ्रॉग रेस, तीन पायाची शर्यत, जिलेबी रेस, कबड्डी , फूटक्रीक, चॉकलेट रेस, पार्टनर रेस यासारख्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात रेवा फरहान, सफिया, आराध्या, करमन्य,रेयांश,शौर्या, आयुश, आर्या, पलक,हर्षल ,तन्मय, चक्षिता ,हसनेन,उजेब, सत्यप्रकाश, आदित्य, भूषण, अथर्व, भावेश, वैष्णवी, परी, चेतना, नियती, आर्या या विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर आणि ब्राँझ मेडल देण्यात आली. सूत्रसंचालन नितेश वाघ तर आभार श्रद्धा देशमुख यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पहिले.