राज्य नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून इंदौरच्या ‘मॉर्फोसीस’ ने मारली बाजी

drama sign

मुंबई, विशेष प्रतिनिधी | ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव या केंद्रातून नाट्यभारती, इंदौर या संस्थेच्या ‘मॉर्फोसीस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ‘ईस्टमन कलर’ या नाटकाला द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य
संचालनालयाने प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.जय गणेश फाऊंडेशन, भुसावळ या संस्थेच्या ‘झेंडुचे फुल’ या नाटकाला तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील

अन्य निकाल पुढीलप्रमाणे :- दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक- श्रीराम जोग (नाटक- मॉर्फोसीस), द्वितीय पारितोषिक- हेमंत पाटील (नाटक-ईस्टमन कलर), प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक अविनाश इंगळे (नाटक-ईस्टमन कलर), द्वितीय पारितोषिक अभिराम कळमकर (नाटक-मॉर्फोसीस), नेपथ्य : प्रथम पारितोषिक दिनेश माळी (नाटक-ईस्टमन कलर), द्वितीय पारितोषिक अनिरुध्द किरकिरे (नाटक-मॉर्फोसीस), रंगभूषा : प्रथम पारितोषिक दिपाली दाते (नाटक-मॉर्फोसीस), द्वितीय पारितोषिक प्रज्ञा बिहाडे (नाटक-ईस्टमन कलर), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक श्रीराम जोग (नाटक-मॉर्फोसीस) व श्रध्दा पाटील (नाटक-इस्टमन कलर), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे हर्षा शर्मा (नाटक-हलगी सम्राट), नेहा झारे (नाटक-ध्यानी मनी), हर्षा बोरोले (नाटक-जतरा), प्रतिक्षा बेलसरे (नाटक-मार्कोसिस), संजिवनी यावलकर (नाटक-झेंडूचं फुल), हेमंत प्रकाश (नाटक- ईस्टमन कलर), राज गुंगे (नाटक-जतरा), अनिल चापेकर (नाटक-ध्यानीमनी), हनुमान सुरवसे (नाटक- हलगी सम्राट), जयेंद्र लेकुरवाळे (नाटक-शकुंतला एक विरह).

ही स्पर्धा १५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०१९ या कालावधीत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह, जळगाव येथे जल्लोषात पार पडली होती. या स्पर्धेत एकूण २१ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून संजय कुलकर्णी, श्रीमती नयना कासखेडीकर आणि अरुण भडसावळे यांनी काम पाहिले. सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content