मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | तिथला एक खासदार मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो, असे शक्य आहे का? असे राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेत म्हटले, यावरून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध हा भाजपचाच कट असल्याचे उघड झाले असल्याचे कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राज ठाकरे यांची आज पुण्यात सभा झाली या सभेत बोलतांना ते म्हणाले कि, मी अयोध्यला गेलो असतो तर केसेस टाकल्या असत्या. महाराष्ट्रातील माझी ताकद उत्तर प्रदेशात नाहक गुन्हे दाखल अडकून पडली असती, कारण तेथे महाविकास आघाडी सरकार नसून योगी सरकार आहे, आणि तिथल्या भाजपच्या खासदाराने राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला.
उत्तर प्रदेशात भाजपचे सरकार असून मुख्यमंत्र्याला एक भाजपचाच खासदार विरोध करतो. त्यामुळे विरोध करणारा सापळा भाजपनेच रचला होता हे मी अगोदर सांगितले होते. ते सत्य ठरले असल्याचे कॉंग्रेसचे सचिन सावंत यांनी ट्वीट करीत दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.