खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी खेड्यापाड्यापर्यंत आरोग्य सेवा पुरवली जाईल आणि सरकार म्हणून शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासले जाईल, असे मनोगत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

 

ध्वजारोहण सोहळ्यास विशेष आमंत्रित म्हणून कोविड योद्धे, डॉक्टर, नर्सेस उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉक्टर्स, नर्सेस, वैद्यकीय आणि पोलिस यंत्रणेत काम करणारे कर्मचारी, स्वच्छता दूत हे खरे कोविड योद्धे आहेत. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करणार, गावोगावी आणि दुर्गम भागापर्यंत चांगल्या आरोग्य सुविधा देणार असून कामगारांचे हित जोपासण्यास प्राधान्य असेल असेही उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जय जवान जय किसान, जय कामगारचा नारा देखील दिला. तसेच कोविडच्या परिस्थितीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. पोलिसांच्या कामगिरीचा सार्थ अभिमान असल्याचे म्हटले. तर ऑनलाइन शिक्षण सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असू राज्यातील प्रमुख शहरांमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Protected Content