मतदार संघात ३० हजार सभासद नोंदणीचा निर्धार- रोहिणी खडसे

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर, बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यासह मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३० हजार सभासदांची नोंदणी करण्याचा निर्धार रोहिणी खडसे खेवलकर यांनी केला आहे. रावेर तालुक्यातील रायपूर, सुदगाव, गहूखेडा, रणगाव, तासखेडा, लुमखेडा या गावात जावून रोहिणी खडसे-खेवलकर यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी १५ ऑगस्ट पासून राष्ट्रवादी काँग्रेस संवाद यात्रेला सुरूवात केली आहे. याला संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या अनुषंगाने बोदवड आणि मुक्ताईनगर तालुक्यात संवाद यात्रेचा पहिला टप्पा संपला आहे. या संवाद यात्रेत रोहिणी खडसे यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून त्या कश्या सोडविता येतील यासाठी माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

नाथाभाऊ यांनी त्यांच्या कार्यकाळात तापी काठावरील प्रत्येक गाव चहूबाजुनी डांबरी रस्त्यांनी जोडले. प्रत्येक गावात अंतर्गत काँक्रीटीकरण, सभागृह, व इतर मुलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला. आगामी काळात सुद्धा नाथाभाऊ यांच्या माध्यमातून राहिलेले विकास कामे पूर्ण करण्यात येतील. या यात्रेत आबालवृद्धासह युवकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या निमित्ताने नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३० हजार सभासद नोंदणी करण्याचा निर्धार आहे.

यावेळी राजेश वानखेडे, रमेश नागराज पाटील, निळकंठ चौधरी, यु डी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी जि प सदस्य रमेश नागराज पाटील, बाजार समिती संचालक पंकज येवले, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु.डी. पाटील, रावेर तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, जि.प. सदस्य कैलास सरोदे, पं.स. सदस्य दिपक पाटील, जेष्ठ नेते हेमराज पाटील, रुपेश पाटील, रामभाऊ पाटील, योगिता वानखेडे, शांताराम पाटील, गोपी पाटील, मधुकर पाटील, कमलाकर पाटील, शशांक पाटील, योगेश्वर कोळी, अमोल महाजन, सिद्धार्थ तायडे, भागवत कोळी, भुषण चौधरी, श्रीकांत चौधरी, वाय डी पाटील, दिपक कोळी, गजानन लोखंडे, किशोर पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भाल शंकर, नंदू भाऊ हिरोळे, भुषण पाटील, चेतन राजपूत, भुषण धनगर, रोहन च-हाटे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content