मतदानकार्डला आधारकार्ड जोडणी करून घेण्याचे आवाहन

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मतदान ओळखपत्रास आधारकार्ड जोडणी करून घेण्याचे आवाहन खामगाव उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभरात मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करणे हा कार्यक्रम १ ऑगस्ट पासून राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने २६ – खमगांव विधानसभा मतदारसंघा अंतर्गत खामगांव तालुक्यातील ज्या मतदारांनी अद्याप पर्यंत मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी केली नाही, त्यांनी आपला आधार क्रमाक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे देऊन आपला आधार क्रमांक मतदार ओळखपत्रास जोडणी करण्याबाबत प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, राजेंद्र जाधव, तसेच सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव अतुल पाटोळे यांनी केले आहे.

Protected Content