मुंबई प्रतिनिधी । मुंबईतील अतिवृष्टीमुळे नागरिकांचे हाल होत असून मालाड येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमिवर महापालिका बरखास्त करण्याची मागणी आज विरोधकांनी केली.
मुंबईतील पावसामुळे नागरिकांचे होणारे हाल आणि मालाड येथील दुर्घटनेच्या मुद्यावरून आज विधीमंडळात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत घोषणाबाजी केल्यामुळे विधानसभा तहकूब करण्यात आली. यानंतर झालेल्या चर्चेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई महापालिका प्रशासनावर जोरदार टीका करून महापालिका बरखास्त करण्याची मागणी केली. तर विधानपरिषदे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.