पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मा. आमदार दिलीप वाघ व संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या सौजन्याने येथील शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या प्रांगणावर एन. एस. क्लब व पाचोरा स्पोर्ट्स आयोजित खुल्या टी – २० व्हाईट लेदर बॉल क्रिकेट लीग स्पर्धेस आज दि. १ नोव्हेंबर पासुन सुरुवात झाली आहे.
या स्पर्धेस एकुण १६ संघांनी सहभाग नोंदविला असुन स्पर्धेचा अंतिम सामना दि. १४ नोव्हेंबर रोजी खेळविला जाणार आहे. विजेत्या संघास पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व आशिर्वाद इन्फ्राचे संचालक मुकुंद बिल्दीकर यांच्या तर्फे ४१ हजार रुपये रोख, उपविजेत्या संघास एम. एस. पी. बिल्डकाॅनचे संचालक मनोज पाटील व पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे यांच्या तर्फे ३१ हजार रुपये रोख व थेपडे बिल्डर्सचे संचालक अपुर्व थेपडे व नंदु शेलार युवा फाऊंडेशन तर्फे तृतीय पारितोषिक ११ हजार रुपये रोख देण्यात येणार आहे. यासोबतच साई मोबाईल तर्फे मॅन ऑफ दी सिरीजचा पुरस्कार २१०० रुपये व ट्राॅफी, नंदु शेलार युवा फाऊंडेशन तर्फे बेस्ट बॅट्समन ला ११०० रुपये व ट्राॅफी व बेस्ट बाॅलर चा पुरस्कार पाचोरा स्पोर्ट्स तर्फे ११०० रुपये रोख व ट्राॅफी देण्यात येणार आहे.
ही स्पर्धा कलर ड्रेस मध्ये खेळविली जात असुन आयोजकांतर्फे कलर ड्रेस पुरविण्यात येत आहे. स्पर्धा यशस्वीतेसाठी एन. एस. क्लबचे अध्यक्ष नंदु शेलार व पाचोरा स्पोर्ट्सचे सुशांत जाधव यांचेसह नंदु शेलार युवा फाऊंडेशन तसेच पाचोरा स्पोर्ट्सचे सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.