रेल्वे गाड्यांमधील उघड्या पेट्यांपासून प्रवाशांना धोका ( व्हिडीओ )

open switch box

भुसावळ प्रतिनिधी । अनेक रेल्वे गाड्यांमध्ये विद्युत प्रवाह असणार्‍या उघड्या पेट्या असल्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला असून याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

भारतीय रेल्वे प्रवास सुरक्षित आणि सुविसकर प्रवास म्हणून ओळखला जातो परंतु अनेक ट्रेन्सच्या डब्यामध्ये, शौचालयाच्या शेजारील इलेक्ट्रॉनिक स्विचेसच्या पेट्या उघड्या असल्याचे दिसून येते. यामुळे प्रवासी आणि विशेष करून लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल हे विविध प्रकारचे डिजिटल रेल्वे बनवण्यासाठी आणि अत्याधुनिक व सुरक्षित रेल्वे बनवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. मात्र प्रवाशांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे.

रेल्वेतून दररोज लक्षावधी प्रवासी प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची आहे. यामुळे रेल्वे गाड्यांमधील स्विचेसच्या उघड्या पेट्या बंद करण्यात याव्या ही अपेक्षा चुकीची ठरणार नाही.

पहा : उघड्या पेट्यांबाबतचा हा वृत्तांत.

Protected Content