मुक्ताईनगर येथील रिक्त नगराध्यक्ष पदासाठी एकमेव उमेदवारी अर्ज वैध

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील नगरपंचायतीचे रिक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रमासाठी प्राप्त झालेला एकमेव उमेदवारी अर्ज छाननी अंती वैध असल्याचे घोषित कर्यात आले.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, “येथील नगरपंचायतीचे रिक्त नगराध्यक्ष पदासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने निवडणूक कार्यक्रम लागलेला असून आज दि.१८ जुलै २०२२ रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे असल्याने या जागेसाठी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजपा पक्षातर्फे पियूष भागवत मोरे (महाजन) यांनी आपला उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे सादर केला. दुपारी २ वाजेनंतर पिठासीन अधिकारी भुसावळ भाग भुसावळ उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाणे यांनी प्राप्त झालेला एकमेव उमेदवारी अर्ज छाननी अंती वैध असल्याचे घोषित केले.

याप्रसंगी माजी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख तथा नगरसेवक ललित महाजन, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, नगरसेवक तथा गटनेते निलेश शिरसाट, नगरसेवक तथा गटनेते राजेंद्र हिवराळे, नगरसेवक तथा उपगटनेते संतोष कोळी, सार्वजानिक बांधकाम सभापती तथा नगरसेवक संतोष मराठे, पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, महीला बालकल्याण सभापती तथा नगरसेविका सविता भलभले, सार्वजानिक आरोग्य व मलनिस्सारण सभापती तथा नगरसेवक नुसरतबी महेबुब शेख यांची उपस्थिती होती.

Protected Content