ऑनलाईन महिला लोकशाही दिनाचे २१ ऑगस्ट रोजी आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

समस्याग्रस्त व पीडित महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, समाजातील पिडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो.

 

या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला व्हॉटसॲप क्रमांक नमूद करावा, जेणेकरुन या लोकशाही दिनाची लिंक व पासवर्ड अर्जदारास उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. तरी संबंधित तालुक्यातील महिलांनी आपल्या तालुक्याचे तहसीलदार यांचे‌ ई- मेलवर अर्ज पाठवावे. असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

Protected Content