खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त ऑनलाइन कार्यक्रम

मुक्ताईनगर प्रतिनिधी । श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाच्यावतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने ऑनलाइन कार्यक्रम आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शिका आशा कुलकर्णी महासचिव, हुंडा विरोधी चळवळ, मुंबई तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एच. ए. महाजन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

प्रमुख मार्गदर्शिका आशा कुलकर्णी यांनी  सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनात युवकांची भूमिका या विषयावर उद्बोधन केले. आज समाजातील ज्वलंत समस्या म्हणजेच स्त्री-पुरुष असमानता, स्त्री-भ्रूण हत्या, हुंडाबळी, समाजातील अनिष्ट परंपरा, अंधश्रद्धा, व्यसनाचा वाढता आलेख, आई-वडिलांचे संगोपन तसेच  ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण इत्यादी पर्यावरणीय समस्या दिवसेंदिवस रुद्र रूप धारण करीत आहेत, त्यामुळे  या समस्या  सामाजिक-सांस्कृतिक व आर्थिक विकासात  प्रमुख अडथळे ठरत आहेत. म्हणून आज देशभरातील प्रत्येक  युवकाने सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय समस्या वरती आवाज उठवून सामाजिक- सांस्कृतिक परिवर्तनाचा धागा बनला पाहिजे असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य महाजन यांनी भारत हा तरुणांचा देश असतानासुद्धा भारतात सामाजिक समस्यांचा हाहाकार निर्माण झालेला आहे. दर दिवशी वर्तमानपत्रात  आणि टीव्ही चॅनल वरती विविध  प्रकारच्या कुटुंब व समाज विघातक घटना पाहायला मिळतात, म्हणून त्या समस्यांच्या निर्मूलनासाठी युवकाने विचार मंथन करून सामाजिक व सांस्कृतिक विकासाची  ज्योत पेटवून कुटुंब,  समाज आणि राष्ट्राची प्रगती साधली पाहिजे असे आवाहन केले.

या ऑनलाईन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. साळवे, प्रा. डॉ. ढाके मॅडम, ग्रंथालय अधिक्षक प्रा. सरोदे यांची विशेष उपस्थिती होती. प्रा. साळवे व प्रा. लढे आणि प्रफुल यमनेरे या विद्यार्थ्यांने प्रश्नोत्तराच्या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ.दिपक बावस्कर यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन एनएसएस अधिकारी प्रा. विजय डांगे यांनी केले.

या कार्यक्रमाला काजल काचकुटे, सारिका भोसले, पूजा गिरी, अचल कवळे, निकिता कपले, कमलेश जावरे, ऋत्विक बढे, तन्मय दानी, निर्मल पाटील गायत्री दुटटे,गायत्री वराडे, श्रद्धा राणे, भाग्यश्री जयकर, ऋषिकेश वानखेडे, सोनाली पाटील, निकिता पाटील, मुक्ता पाटील व सारिका पाटील अशा असंख्य विद्यार्थ्यांनी ऑनलाइन उपस्थिती दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी पाचपांडे प्रास्ताविक एन एस एस महिला अधिकारी प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर आभार प्रदर्शन कु. भाग्यश्री बोरोले हिने केले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने ऑनलाइन उपस्थित होता.

 

Protected Content