रावेर प्रतिनिधी । प्रथमच १५ ऑगस्टला झूम अँप द्वारे रावेर तालुक्यातील स्वातंत्र सैनिकांशी तहसीलदार उषाराणी देवगुणे संवाद साधणार आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा ध्वजारोहणच्या कार्यक्रमात झूम ॲपवरुन सन्मान करण्यात येणार आहे.
सर्वत्र कोरोना पादुर्भाव सुरु असून रावेर तालुक्यातील ४४ वयोवृध्द स्वातंत्र सैनिक यांना येणाऱ्या १५ ऑगस्टला झूम ॲपवर त्यांच्याशी तहसिलदार सौ उषाराणी देवगुणे संवाद साधनार असून त्यांच्या स्वातंत्रदिनी त्यांच्या सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तहसील प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
तालुक्यातील खिरोदा प्र यावल येथील २८ स्वातंत्र सैनिक असून चिनावल येथील ३ पाल येथील २ सावखेडा, उटखेडा, मुंजलवाडी, मोरगाव, दसनुर, वाघोड, सिंगनुर, निंभोरा, ख़िर्डी, मस्कावद, कळमोदा येथील प्रत्येक एक असे एकूण ४४ स्वातंत्र सैनिक तालुक्यात आहे.त्यांना तलाठी मार्फत झूम अँप ऑनलाइन जोडण्यात येणार आहे.
jay jawan, indenpendant day, raver new, raver tahasildar, usharani devgune, Savkheda, Utkheda, Munjalwadi, Morgaon, Dasnur, Waghod, Singnur, Nimbhora, Khirdi, Maskavad, Kalmoda