पावणे पाच लाखात तरूणाची ऑनलाईन फसवणूक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भाईटे नगरात राहणाऱ्या एका तरूणाला टेलीग्राम व इंटरनेटच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क देवून तब्बल ४ लाख ८९ हजार ४०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना २८ जून रोजी उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी अंती शनिवारी २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, एका तरूणाला टेलीग्राम व इंटरनेटच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने १४ एप्रिल ते २८ जून दरम्यान संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केले. त्यानंतर त्यांना काही टास्क पुर्ण करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळे कारण सांगून तब्बल ४ लाख ८९ हजार ४०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही मोबदला मिळाला नाही. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने शनिवारी २९ जून रोजी रात्री १०.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी हे करीत आहे.

Protected Content