कांदे अखेर स्वस्त

kanda

नवी दिल्ली वृ्त्तसंस्था । कांद्याच्या वाढत्या किंमतींनी त्रस्त झालेले लोकांना लवकरच दिलासा देण्याची चिन्हे दिसत आहेत. ग्राहक मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयात केलेले कांदे आता काही दिवसात उपलब्ध होणार असून स्वस्त दरात मिळण्याची सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्र आणि गुजरात येथून नवीन कांद्याच्या पिकाची आवकही वेगाने होणार असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय एमएमटीसीमार्फत ३० हजार मेट्रिक टन कांदा आयात करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर आता या कांद्याची आयातही येत्या२७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कांद्याच्या वाढत्या किंमतीला डिसेंबरच्या मध्यावर आळा बसेल. डिसेंबरअखेर कांद्याचे दर खाली येतील असे सांगितले जात आहे. याचे कारण म्हणजे कांदयाची आवड वाढल्यामुळे मग कांद्याची मागणी आणि पुरवठा यातील फरक अतिशय कमी झाल्यामुळे असे होईल असे सरकारी अधिकारी म्हणाला. देशात कांद्याचे उत्पादन कमी झाल्यामुळे कांद्याचे दर वाढले असल्याचे कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी लोकसभेत सांगितले आहे. कांद्याचे दर वाढल्यानंतर त्याच्या निर्यातीवर बंदी आणली गेली आणि आयात करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती तोमर यांनी दिली. राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही कांद्याचे दर नियंत्रित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले गेले असल्याचे तोमर म्हणाले.

Protected Content