जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गोलाणी मार्केट परिसरातील संतोष ज्यूस सेंटर दुकानासमोरून तरूणाची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अजयसिंग नागेन प्रतापसिंग राजपूत (वय-३५) रा. रामेश्वर कॉलनी जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, ६ जून रोजी सकाळी ११ वाजता गोलाणी मार्केट येथे दुचाकी (एमएच १९ बीएल ३२९६) ने कामावर आले. मार्केट परिसरातील संतोष ज्यूस सेंटर जवळ त्यांनी दुचाकी पार्क करून लावली होती. सायंकाळी ९ वाजता काम आटोपून ते घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांना जागेवर दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू कुठेही आढळून आली नाही. शुक्रवार १० जून रोजी दुपारी साडेबारा वाजता शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.