चित्रा चौकातून एकाची दुचाकी लांबविली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चित्रा चौकात खरेदीसाठी आलेल्या प्रौढ व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्रकुमार शंकरलाल राका (वय-५२) रा. मुक्ताईनगर, पिंप्राळा हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ बीएल ५७६६)ने शहरातील चित्रा चौकातील बालाजी ईलेक्ट्रिक दुकानावर आले. दुकानासमोर दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांनी लावलेली १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सुरेंद्रकुमार राका हे जेव्हा परत आले तेव्हा त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात  शोधाशोध करूनही त्यांना दुचाकी आढळून आली नाही. अखेर दहा दिवसानंतर बुधवार ७ एप्रिल रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहे.

 

Protected Content