जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून एकाचा ५ पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णराज हेमराज पाटील (वय-५२) रा.पाचोरा हे जळगावात एका दैनिकात पत्रकार म्हणून काम करतात. २७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेसात ते सात वाजेच्या दरम्यान पाचोरा येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आले असता त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल चोरीस गेला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु मोबाईल मिळून आला नाही. त्यांनी या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल फिरोज तडवी करीत आहे.