जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील जे.के. पार्क येथून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २९ जानेवारी रोजी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, सलीम शब्बीर शेख (वय-३१) रा. तांबापूरा जळगाव हे परिवारासह वास्तव्याला आहे. २२ जानेवारी रोजी ते शहरातील मेहरूणी येथील जे.के. पार्क येथे दुचाकी (एमएच १९ सीएल ३४३२) ने आले होते त्यावेळी त्यांनी त्यांची दुचकी पार्क करून लावली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची ३० हजार रूपयं किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे करीत आहे.