जळगाव प्रतिनिधी । शहरातील भास्कर मार्केट परिसरातून एकाची ३० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामानंदनगर परिसरात अंमल भरीत सेंटरसमोर संजय ठनसिंग पाटील (वय-४९) हे वास्तव्यास आहेत. ते खासगी वाहन चालक आहेत. ३१ जानेवारी रोजी मालवाहू वाहन घेऊन कामानिमित्ताने पाळधी येथे गेले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची (एमएच १९ बीएस्क २४३१) या क्रमांकाची दुचाकी भास्कर मार्केट परिसरातील द्वारका हॉस्पिटलच्या बाजूला उभी केली होती दुपारी २ वाजता संजय पाटील पाळधीहुन देऊन परतले असता त्यांना त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शोधाशोध केल्यानंतर दुचाकी कुठेही मिळाली नसल्याने जिल्हापेठ पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोहेकॉ फिरोज तडवी हे करीत आहेत.