यवतमाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | यवतमाळ जिल्हयातील वणी तालुक्यात मोठया प्रमाणाावर अवैध धंदे सुरू आहे. यात मटका, जुगार अवैध व्यवसाय खुल्यावर सुरू असूनही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला होता. या व्यवसायाची पोल खोल करण्यासाठी मटका अड्डयावर धाड टाकली आणि पोलिस प्रशासनाला जागे केले.
यवतमाळ जिल्हा हा कोळा खदानासाठी संपूर्ण राज्यात प्रसिध्द आहे. विशेष करून जिल्हयातील वणी तालुक्यात मोठया प्रमाणावर कोळखा खदाने आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातील मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग या ठिकाणी वास्तव्यास आहे. दिवसभर मोलमजूरी करून मिळालेल्या पैशातून मजूर काम केल्यानंतर मटका जुगार खेळून पैसे हरतात. यामुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहे. दुसरीकडे गुन्हेगारीला उत येत आहे. असे असताना असे प्रकार खुलेआम सुरू असून पोलीस प्रशासन याकडे का लक्ष देत नाही, असा प्रश्न या निमित्याने निर्माण झाला आहे.