जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरू चौकातील आयडीबीआय बँकेच्या गेट समोरून एकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी १ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी गुरुवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एकनाथ विश्वनाथ दारकुंडे वय-५२, रा. शिवाजीनगर जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मंगळवारी ३० जुलै रोजी दुपारी १ वाजता ते त्यांची दुचाकी (एमएच १९ एयू ७२९३) ने जळगाव शहरातील नेहरू चौकातील आयडीबीआय बँकेसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी दुचाकी पार्क करून लावली. दरम्यान आपल्या चोरट्यांनीही दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा शोध घेतला, परंतु दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी गुरुवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे करीत आहे.