जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । २जळगाव तालुक्यातील जळके गावातील विठ्ठल मंदिराजवळ राहणाऱ्या तरुण वाहन चालकाचे घरासमोर उभी दुचाकी लांबवल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार ५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे
जळगाव तालुक्यातील जळके गावात किरण हिलाल चिमनकारे वय 27 हा तरुण राहतो. वाहन चालक म्हणून काम करतो. 24 जून रोजी रात्री अकरा वाजता किरण याने त्याची एम एच 19 सीसी 1950 या क्रमांकाची दुचाकी नेहमीप्रमाणे विठ्ठल मंदिराजवळ घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता घरासमोर उभी दुचाकी मिळून आली नव्हती. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आल्याने दहा दिवसानंतर बुधवारी किरण याने एमआयडीसी पोलिसांना तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध वीस हजार रुपयांची दुचाकी चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे हे करीत आहेत.