शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये महाबीज बियाणे प्लॉट घेण्याचे आवाहन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खरीप २०२३ हंगामामध्ये जळगाव जिल्ह्यात महाबीजमार्फत ज्युट, उडीद, मुग सोयाबीन, तीळ, तुर, सनहेम्प इ. पिकांसाठी सीड प्लॉट योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती एस. कि. ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, जळगाव यांनी दिली आहे.

सीड प्लॉटसाठी आवश्यक असलेले पायाभूत बियाणे बिजोत्पादकांना महाबीज़ मार्फत योग्य किमतीत देण्यात येते. पिकाचे संपूर्ण उत्पन्न महाबीज परत विकत घेते. सीड प्लॉटसाठी पायाभूत दर्जाचे बियाणे वापरल्यामुळे उत्पन्नात वाढ होते. दर बाजारभावापेक्षा २० ते २५% जास्त मिळत असल्याने आर्थिक फायदा होतो. बियाणे उगवण क्षमता व चांगले बियाणेचे प्रमाण या गुणवत्ता निकषावर रू ७५ ते १२५ प्रति क्विं वाढीव भाव दिला जातो, त्यामुळे सर्वसाधारण बाजारभाच्या तुलनेत शेतकऱ्याला जास्त भाव मिळतो. हा कार्यक्रम राबविण्याकरीता एका गावात सर्व पिके मिळून २५ एकर एवढे क्षेत्र असणे आवश्यक आहे. सिड प्लॉटची नोंदणी रु १००/ प्रति एकर भरून सुरू झाली असून नोंदणीची अंतीम तारीख 10 मे, 2023 पर्यंत आहे.

खरीप हंगामासाठी विशेषकरून ज्यूट या पिकाचे बियाणे उत्पादन प्लॉट देण्याचे महाबीजने निश्चित केलेले आहे. ज्यूट पिकाचे बियाणे हमी भाव रू ४०००/- व बोनस रू ४०००/- असे एकुण रु ८०००/- प्रति क्विंटल दर मागील २ वर्षांपासून महाबीज अंतिम पात्र बियाण्यास देत आहे. ज्यूट पिकाचे कोणतेही पाळीव प्राणी, वन्यप्राणी, नुकसान करत नाही आणि इतर लागवड खर्च सुद्धा कमी येतो तसेच पिकामुळे जमिनिचा पोत सुधारण्यास मदत होते. ज्यूट पिकाचे चांगले नियोजन करून ५-६ क्विंटल पर्यंत उत्पन्न शेतकऱ्यांनी घेतलेले आहे. या पिकाची यांत्रिक पद्धतीने सुद्धा मळणी/ काढणी करता येते.

तरी ज्युट, उडीद, मुग, सोयाबीन, तीळ, तुर, सनहेम्प इ. पिकाचे सीड प्लॉट मध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आर्थिक प्रगती साधावी. सीड प्लॉट नोंदणीसाठी एस.पी. देवरे यांचेशी संपर्क साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सीड प्लॉट मध्ये सहभागी व्हावे. तसेच सीड प्लॉट नोंदणीसाठी जळगाव-९४२०८३६५८३, एरंडोल-७०८३५६९८४९, पाचोरा-९९२२२९५५३९ व रावेर-८९९९०६२७२२ या मोबाईल क्रमांकावर संबंधीत महाबीज कृषी क्षेत्र अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असेही श्री. ठाकरे यांनी कळविले आहे.

Protected Content