शेताच्या बांधावरून एकाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव ते वेल्हाळा रोडवरील शेताच्या बांध्यावर पार्कींगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यासंदर्भात अधिक असे की, दिलीप रमेश पाटील (वय-३८) रा. वेल्हाळे ता.भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता दिलीप पाटील हे दुचाकी क्रमांक ( एमएच १९ डीक्यू ६७३८ ) ने शेतातील बांधावर कामावर आले. त्यावेळी शेताच्या बांधावरच दुचाकी पार्कींग करून शेतात निघून गेले. त्यानंतर साडेदहा वाजता दुचाकीजवळ आले असता त्यांनी दुचाकी जागेवर दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. अखेर रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता वरणगाव पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉन मनोहर पाटील करीत आहे.

 

Protected Content