अशोक टॉकीज परिसरातून दुचाकी लांबवली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अशोक टॉकीजच्या बाजूला असलेल्या प्रभात हार्डवेअरच्या दुकानात जवळून एकाची २५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, समाधान सुरेश महाजन (वय-४६) रा. अयोध्या नगर, बालाजी मंदिर परिसरात जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून मजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. २२ शनिवार ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते साडेतीन वायच्या सुमारास ते त्यांची दुचाकी (एमएच १९ बीएक्स ४९८०) याने जळगाव शहरातील आकाश अशोक टॉकीजच्या बाजूला असलेल्या प्रभात हार्डवेअर दुकानाच्या बाजूला येऊन कामानिमित्त आले होते. त्यावेळी त्यांनी दुजाकी हार्डवेअर दुकानाच्या बाजूला पार्किंग करून लावली होती आज्ञा चोरट्याने २५ हजार रुपये किमतीची दुचकी चोरून नेल्याचे उघडकीला आले. समाधान महाजन यांनी सर्वत्र परिसरात शोध घेऊन दुचाकीचा शोध घेतला असला त्यांना दुचाकीचा कुठलाही शोध लागला नाही.अखेर त्यांनी रविवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी ३.३० वाजता धाव घेऊन जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content