जळगाव प्रतिनिधी । उसनवारीचे पैसे घेण्याच्या कारणावरून एकाला दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना सिंधी कॉलनीजवळील लक्ष्मी नगरात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शिवाजी नळकंठ सोनार (वय-४८) रा. गणपती नगर, कुसुंबा ता.जि.जळगाव हे किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. जळगाव शहरातील सिंधी कॉलनीजवळील लक्ष्मी नगरात राहणाऱ्या मनिषा दिनेश जैन या महिलेला शिवाजी सोनार यांच्या बहिण लताबाई पुंडलिक सोनार आणि भाची पिंकी पुंडलिक सोनार यांच्या मध्यस्थीने उसनवारीने पैसे दिले होते. ते पैसे देत नसल्याच्या कारणावरून शिवाजी सोनार हे आज रविवारी १३ जून रोजी दुपारी दीड वाजता बहिण व भाची सोबत मनिषा जैन यांच्याकडे आले. पैसे मागितल्याचा राग आल्याने मनिषा जैन यांनी शिवीगाळ करून हातातील दगड फेकून मारले. यात शिवाजी सोनार यांच्या डोक्याला जखम झाले. तू पुन्हा पैसे मागितले तर तूला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. शिवाजी सोनार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दुर्गेश सोनार करीत आहे.