पायी जात असलेल्या एका अनोळखी प्रौढाचा जागीच मृत्यू
धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पिंपळे बुद्रुक गावाजवळ भरधाव कारने दिलेल्या धडकेत अनोळखी ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १२ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात कार चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की. धरणगाव ते चोपडा रोडवर असलेल्या पिंपळे बुद्रुक गावाजवळ असलेल्या रोडवरून भरधाव कार क्रमांक (एमएच १९ सीएफ २१४३) ने एका पायी जाणाऱ्या अनोळखी अंदाजे ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला जोरदार धडक दिली होती. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान पिंपळे बुद्रुक येथील शेतकरी संजय पाटील यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार कारचालक सिजो जॉनी चौनादन रा. अकुलखेडा ता. चोपडा यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर शिंदे करीत आहे.