दुचाकी चालविण्यावरून एकाला फायटरने मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तुला जास्त झाले आहे का, तू रस्त्यावरुन जोरात मोटार सायकल चालवतावे असे म्हणत तरुणाला फायटरने मारहाण करुन गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास आरएमएस कॉलनीत घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शहरातील आरएमएस कॉलनीत भूषण विश्र्वनाथ माळी हा तरुण वास्तव्यास आहे. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास भुषण हा दुचाीवरुन घरी जात होता. यावेळी बबलू उर्फ भरतीनाथ पंढरीनाथ अनुशे याने त्याला थांबविले आणि तुला जास्त झाले आहे का, तू रस्त्यावरुन जोरात मोटार सायकल चालवतो असे म्हणत त्याला शिवीगाळ करु लागला. त्यानंतर  त्याचा भाऊ धनवीर भरतीनाथ अनुशे हा त्याठिकाणी आला आणि दोघ भावांनी भूषणला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामारहाणीत धनवीर अनुशे याने त्याच्या हातातील फायटर हे भूषणच्या नाकावर मारुन त्याला गंभीर जखमी ेकेले आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. जखमी अस्थेत असलेल्या भूषणने तात्काळ रामानंद नगर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरुन बबलू उर्फ भरतीनाथ पंढरीनाथ अनुशे, धनवीर भरतीनाथ अनुशे दोघ रा. आरएमएस कॉलनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content