कोरोना : जळगावात नव्याने ६ रूग्ण संशयित म्हणून दाखल; पहिला कोरोनाग्रस्त रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह

जळगाव प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज नव्याने ६ रूग्ण संशयित कोरोना म्हणून दाखल करण्यात आले आहे. आज दिवसभरात ११६ रूग्णांचे स्क्रिनिंग करण्यात आले त्यातील ११० जणांना संशयित म्हणून दाखल केल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

१३ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात कोविड-१९ संबंधित तपासणी करण्यातसाठी ११६ जणांची स्क्रिनिंग करण्यात आली. यात ११० जणांना संशयित म्हणून त्यांचे स्वॅब घेण्यात आले आहे. आत्तापर्यंत २ रूग्ण पॉझिटीव्ह आले असून त्यातील एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रूग्णाचा आज पहिल्या तपासणी अहवालात रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात आजपर्यंत २३३ रूग्ण संशयित म्हणून दाखल होते. त्यातील २१० जणांचे मेडीकल अहवाल निगेटीव्ह, २ पॉझिटीव्ह, २ रिजेक्टटेड करण्यात आले तर १९ जणांचे मेडीकल अहवाल येण्याचे बाकी आहेत.

कोरोना अहवाला निगेटीव्ह २१० पैकी १६१ जणांना होम क्वॉरंटाईन म्हणून वैद्यकिय अधिकारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३ हजार ५२२ जणांचे स्क्रिनिंग करण्यात आल्याची माहिती शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content