पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात किरकोळ वादातून खून केल्याची घटना घडली आहे. जिल्हयातील कोंढव्यात तीन जणांनी मिळून एकाला मारहाण करून त्यांची हत्या केली. याप्रकरणी एकाला अटक केली असून दोन अल्पवयीनांही ताब्यात घेतले आहे. शकिल गुलाब शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. यश शाम आसवरे असे अटक करण्यात आलेल्याचे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनूसार वृत्त असे की, शकिल शेख हा मिळेल ते काम करायचा. त्याला दारूचे व्यवन होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी गाडगे महाराज शाळेसमोर शकिल थांबलेला होता. त्यावेळी यश आणि त्याचे दोन साथीदार तेथे होते. त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर शकिल तेथील पडीक खोलीमध्ये पळाला. पाठोपाठ आरोपींनी त्या खोलीमध्ये जावून त्याला मारहाण केली. या मारहाणीत शकीलच्या छातीत, हनुवटीवर तसेच डोक्यात मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. सकाळी हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला असता पोलिस पथकाने घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन अल्पवयीन तरूणांचा समावेश आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.