पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात शेअर ट्रेडिंगमधून नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या महिलेची २८ लाख ५१ हजार ४६० रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर चोरटयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वृत्त असे की, सायबर चोरटयांनी महिलेशी व्हाटसअपवर संपर्क करून शेअर टेडिंग मधून चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिष दाखविले. यानंतर महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यात २८ लाख ५१ हजार ४६० रुपये पाठवायला लावून फसवणूक केली. ही घटना १३ ते १७ जानेवारी या दरम्यानच्या काळात घडली आहे.याप्रकरणी अज्ञात सायबर चोरटयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहे.