Home प्रशासन तहसील विज कोसळल्याने कोचूर येथील एकजण जखमी

विज कोसळल्याने कोचूर येथील एकजण जखमी

0
44

रावेर प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे एक व्यक्ती शेतात काम करत असतांना अंगावर विज कोसळल्याने कोचुर येथील व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

रावेर तालुक्यात जोरदार मूसळधार पाऊस पडला असून यामुळे तालुक्यातील अनेक नद्याना पुर आले होते. कोचर येथील.अजित भिलासींग परदेशी रा.कोचुर ता.रावेर हे शेतात काम करत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आहे. त्यांना सावदा येथील सुनील चौधरी यांच्या हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे त्यांची तब्येत धोक्याबाहेर आहे.तर रावेर शहरासह आहीरवाडी के-हाळा भागात देखिल जोरदार पाऊस झाला पावसामुळे पिकांचे नुकसान किती झाले या संदर्भात तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी आपला मोबाईल बंद करून ठेवला आहे.

 


Protected Content

Play sound