किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

जळगाव-लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको भागात देशी दारूच्या दुकानाजवळ काहीही कारण नसतांना एका तरूणाला तीन जणांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अजय जीवन पवार वय ३४ रा. खंडेराव नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी १४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता पिंप्राळा हुडको परिसरातील दारूच्या दुकानात किरकोळ वादातून तीन जणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. यातील एकाने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली आहे. याप्रकरणी अजय पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी १५ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ सत्यवान वारंगे हे करीत होते.

Protected Content