Home क्राईम परिवाराला लोखंडी रॉडने मारहाण; एकास अटक

परिवाराला लोखंडी रॉडने मारहाण; एकास अटक

0
47

भुसावळ प्रतिनिधी । घराबाहेर बसलेल्या कुटुंबियांना मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

फिर्यादी पुष्पा शंकर गोसावी ( राहणार तुकाराम नगर भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक ८ मे रोजी रात्री ११:०० वाजेला घराबाहेर बसले असतांना दोन इसम मोटरसायकल वरती आले. गोसावी यांच्या घराशेजारील राहणारे नाना शंकर माळी व त्याची आई लिलाबाई शंकर माळी या दोघांना भेटले.सदरील लोकांनी आमच्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगितले. आई सोबत बसलेला वैभव निवृत्ती पाटील ,निलिमा निवृत्ती पाटील, अनुजा वैभव पाटील व मुलगी संगीता गोसावी अशांना लोखंडी रॉड, लाकडी काठ्यांनी मारहाण केली. सुरू असलेले भांडण आवराआवर करणार्‍या पंकज नेमाडे यालाही मारहाण केली. नातू प्रणय अशोक गोसावी याला डोक्याच्या डाव्या साईडला लोखंडी रॉड ने मारहाण केली. तसेच रक्तबंबाळ केले तसेच डाव्या हातावर व अंगठयावर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नाना माळी, लिलाबाई माळी, अनोळखी दोन इसम यांच्या विरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग – ५ कलम ३२६,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील नाना माळी याला अटक करण्यात आली असून प्रणय याला डोक्याला सात टाके पडलेले असून सिव्हिल हॉस्पिटल मध्ये रवाना करण्यात आले आहे. पुढील तपास तपास पोहेकॉ जयराम खोडपे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound