जळगाव प्रतिनिधी । पुण्यातील प्लॉट भाड्याने घेण्याचे सांगून जळगावातील एका प्रौढाच्या बँक खात्यातून ७३ हजाराची रोकड काढून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर असे की, मुरलीधर रामचंद्र झोपे (वय-५७) रा. विजय कॉलनी, गणेश कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. दरम्यान पुण्यात त्यांच्या मालकीचा एक प्लॉट आहे. त्यांना त्यांचा पुण्यातील प्लॉट भाड्याने देण्याचे सांगून एका मोबाईल धारक रणदिपसिंग आणि राहूल कुमार (पुर्ण नाव माहित नाही) यांनी मोबाईलने मुरलीधर झोपे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या पुण्यातील बँक खात्यातून परस्पर ७३ हजार ५०० रूपयांची रक्कम काढून फसवणूक केली. मुरलीधर झोपे यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास शेंडे करीत आहे.