सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये शहरात पुन्हा एक नवीन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आला असून संबंधीत पेशंटचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सावदा येथे कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून रूग्ण संख्या वाढीचा दर कमी झाला असला तरी यातील सातत्य टिकून असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील एक रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले आहे. शहरातील चित्रकुट नगरातील ५४ वर्षे वय असणार्या महिलेला कोरोनाची बाधा असल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, संबंधीत रूग्ण महिलाचा रहिवास असणारा भाग कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात येणार असून येथे फवारणी करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
आजच्या कोरोना बाधीत रूग्ण महिलेमुळे सावदा येथील आजवरच्या बाधीत रूग्णांची एकूण संख्या ५९ इतकी झालेली आहे. यापैकी ९ रूग्णांचा मृत्यू झाला असून पाच जणांवर उपचार सुरू आहेत. तर उर्वरित सर्व रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शहरात सध्या तीन दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू असून यात नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !
वेबसाईट: https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००
जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज
jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news