एक लाखाची बुलेट चोरट्यांनी लांबविली

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर पार्किंगमधून १ लाख रूपये किंमतीची बुलेट चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, युवरात पोपट चोपडे (वय-२६) रा. बसस्थानक जवळ, न्हावी, ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांच्या वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. ८ मे रोजी रात्री १२.३० ते पहाटे ३ वाजेच्या दरम्यान त्यांच्या मालकीची (एमएच १९ सीएल ५५५८) बुलेट त्यांच्या घरासमोर पार्क करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी ही बुलेट चोरून नेल्याचा प्रकार प्रकार पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीला आला. त्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतु बुलेट कुठेही मिळून आली नाही. अखेर सोमवार ९ मे रोजी सायंकाळी सात वाजता युवराज चोपडे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.

 

Protected Content