मलंगगडावर दरड कोसळून एकाचा मृत्यू; दोन जखमी

ठाणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ठाणे जिल्हयात अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर सोमवारी पहाटे दरड कोसळली. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 2 जण जखमी झाले. गुलाम सय्यद असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर त्यांचा दीड वर्षांचा मुलगा व पत्नी नाभिया गंभीर जखमी झालेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार सोमवारी सकाळी 7 च्या सुमारास दरड कोसळण्याची ही घटना घडली. घरावर दरड कोसळत असल्याचे पाहताच गुलाम सय्यद आपल्या मुलाला वाचवण्यासाठी धावले. पण दुर्दैवाने ते दरडीखाली दबले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही जखमींवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Protected Content