जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील तरसोद गावाजवळील रेल्वे रूळावर धात्या रेल्वेचा धक्का लागल्याने ४८ वर्षीय व्यक्तीचा जागची मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी समोर आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नेांद करण्यात आली आहे. विष्णू जुलाल पाटील (वय-४८, रा. तरसोद ता. जळगाव ) असे मयत झालेल्या प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत अधिक असे की, विष्णू जुलाल पाटील हे आपल्या परिवारासह जळगाव तालुक्यातील तरसोद येथे वास्तव्याला आहे. रविवारी २८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तरसोद गावाजवळील रेल्वे लाईनच्या अप लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४२६ च्या २ ते २८ च्या दरम्यान धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आले. याबाबत नशिराबाद पोलीसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख हे करीत आहे.