डॉक्टरांसाठी रविवारी एकदिवसीय कार्यशाळा

 

जळगाव, प्रतिनिधी | जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटना आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत डॉक्टरांसाठी रविवारी दि. २० ऑक्टोबर रोजी एकदिवसीय कार्यशाळा आयएमए हॉल येथे सकाळी ९ वाजेपासून घेण्यात येणार आहे.

केंद्रीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या मार्गदर्शिकेनुसार ही कार्यशाळा होणार आहे. कार्यशाळेचा विषय “वर्तणुकीची प्राथमिकता” असा आहे. वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर तीन प्रख्यात वक्ते अहमदनगर येथील बालचिकित्सक डॉ. सुचित तांबोळी, मुंबई येथील अंजना थडानी, पुणे येथील डॉ. गीता करंबेळकर मार्गदर्शन करणार आहे. यात वयानुसार सामान्य आणि असामान्य वर्तन, वर्तनाचा न्यूरोलॉजिकल आधार, चिंता आणि संबंधित विकार आणि व्यवस्थापन, ओपीडीमधील सामान्य वर्तणुकीशी संबंधित समस्या, ओसीडी, वर्तनाचे विकार, लैंगिक वर्तणुकीशी संबंधित समस्या, ड्रगचा गैरवापर यासारख्या किशोरवयीन वर्तणुकीशी संबंधित समस्या, बालपण उदासीनता आणि व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेत डॉक्टरांनी सहभागी होण्यासाठी अंकुर हॉस्पिटल, अग्रवाल चौफुली येथे नोंदणी करावी किवा प्रमोद सोनार यांचेशी ९३७००६७४३८ संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष डॉ. अजय शास्त्री, सचिव डॉ. मंदार काळे, खजिनदार डॉ. अविनाश भोसले यांनी केले आहे.

Protected Content