चेन्नई वृत्तसंस्था । भारताविरुद्धच्या पहिल्या वनडे मालिकेला सुरुवात झाली असून सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम मैदानात वेस्ट इंडिजविरुद्ध भारत प्रथम फलंदाजी करण्यास उतरेल.
चेन्नईच्या या मैदानावर दोन वर्षानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय वनडे होत आहे. या मैदानावर १७ सप्टेंबर २०१७ रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अखेरचा सामना झाला होता. त्या सामन्यात भारताने २६ धावांनी विजय मिळवला होता. नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मनीष पांडे, शार्दुल ठाकूर, मयांक अग्रवाल आणि युजवेंद्र चहल या सामन्यात खेळणार नसल्याचे सांगितले. भारताकडून या सामन्यात शिवम दुबे वनडेत पदार्पण केले आहे.