चौघुले प्लॉट परिसरातील एकाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील चौघुले प्लॉट येथे राहणाऱ्या ४९ वर्षीय प्रौढ व्यक्तीने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अशोक यशवंत शिंदे (वय-४९) रा. चौघुले प्लॉट, जळगाव असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “अशोक शिंदे हे पत्नी व मुलगासह चौघुले प्लॉट परिसरात वास्तव्याला आहे. ते कोल्हापुरी मशिनरी दुकानात नोकरीला होते. आज रविवार असल्याने अशोक शिंदे हे घरीच होते. दुपारी १२ वाजता त्यांची पत्नी छाया या मुलगा राहुलसोबत टॉवर चौकातील जैन मंदीरात आल्या होत्या. त्यावेळी ते घरी एकटेच होते. घरी कुणीही नसतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली.

दुपारी ४ वाजता मुलगा राहुल आणि पत्नी छाया या घरी आल्या तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीला आले आहे. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसून याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!